मंडळाच्या ५७ व्या दि. ०२-०३-२०२१ रोजीच्या बैठकीत खालील प्रमाणे ठराव पारित करण्यात आलेला आहे . ठराव क्र ५७(२)/२०२१:- सन २०२०-२१ या वित्तीय वर्षात कोविद १९ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे बहुतांश कालावधीत शाळा / महाविद्यालये बंद होती अथवा ऑनलाईन पद्धतीने कार्यरत होती अशा स्थितीत दिनांक ०१-०४-२०२० ते दि . ३१ - ०३- २०२१ या कालावधीत शैक्षणिक सहाय्याच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी शाळा /महाविद्यालयातील उपस्थितीची अट शिथिल करण्यात येत आहे.    ठराव क्र ५७(५)/२०२१:- कोविद १९ विषाणूच्या प्रादुर्भाव कालावधीत जिल्हा कार्यालये नियमितपणे कार्यरत नसल्यामुळे नूतनीकरण होऊ न शकलेले व दि. ०१-०४- २०२० ते ३१-०३-२०२१ या कालावधीत बांधकामाच्या ठिकाणी अपघाती मृत्यू झालेल्या प्रकरणी बांधकाम कामगारांच्या वारसांना मंजूर योजनेकरिता देय अर्थसहाय्य देण्यात यावे. असा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला.

सूचना:

ज्या नोंदीत जिवीत (सक्रिय) बांधकाम कामगारांचे बँक खाते बंद असल्याने किंवा बँकाचे एकत्रीकरण (Merger) झाल्याने मंडळाकडील कोविड-19 चे अर्थसहाय्य रु.१,५००/- मिळालेले नाही अशा बांधकाम कामगारांनी जवळच्या जिल्हा कार्यालयात / जिल्हा कामगार सुविधा केंद्रात तातडीने संपर्क करुन आपला बँक खाते तपशील उपलब्ध करुन द्यावा. जेणेकरुन आपल्याही बँक खात्यात रु.१,५००/- चे अर्थसहाय्य जमा करणे शक्य होईल.


जिन जीवित (सक्रिय) निर्माण श्रमिकों के बैंक खाते के बंद होने या बैंक के एकत्रीकरण (Merger) के कारण मंडळ द्वारा दी जानेवाली 1500/- रुपये की कोविद -19 वित्तीय सहायता नहीं मिली है, वे मजदूर अपनी संबंधित जानकारी प्रदान करने के लिए तुरंत निकटतम जिला कार्यालय / जिला कामगार सुविधा केंद्र से संपर्क करें और जिला कार्यालय को बैंक खाते का विवरण सादर करें ताकि आपके खाते में भी रु.1500/- की सहायता निधी क्रेडिट किया जा सके.

District wise details of assistance of Rs 1,500/- during COVID – 19 pandemic.

Number Of beneficiaries :