महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ


रोजगार नियमन व सेवाशर्ती

इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या रोजगार व सेवाशर्तीचे नियमन करण्यासाठी व त्यांच्या सुरक्षा, आरोग्य व कल्याणासाठी उपाययोजना करण्याकरीता खालील अधिनियम / नियम केंद्र व राज्य शासनाने निर्गमित केले आहेत.
 
The building and other construction workers' welfare cess act, 1996
इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण उपकर कायदा, 1996
 
The building and other construction workers' welfare cess rules, 1998
इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण उपकर अधिनियम, 1998
 
The building and other construction workers' (Regulation of employment and conditions of service) act, 1996
इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार व सेवाशर्ती नियमन) कायदा, 1996
 
The building and other construction workers' (Regulation of employment and conditions of service) central rules, 1998
इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार व सेवाशर्ती नियमन) केंद्रीय अधिनियम, 1998
 
The Maharashtra building and other construction workers' (Regulation of employment and conditions of service) central rules, 2007
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार व सेवाशर्ती नियमन) अधिनियम, 2007

इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियमातील महत्वाच्या तरतूदी

 1. इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार नियमन व सेवाशर्ती) अधिनियम, १९९६ (१९९६ चा २७) च्या कलम ६२ व कलम ४० द्वारे प्रदान करण्यात आलेल्याअधिकाराचा वापर करुन, महाराष्ट्र शासनानेमहाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार ( रोजगार नियमन व सेवाशर्ती ) नियम, २००७ तयार केले असून, दिनांक १ मे २०११ रोजी त्रिपक्षीय महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या त्रिपक्षीय मंडळाची स्थापना केलेली आहे.
 2. इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण उपकर अधिनियम, १९९६ च्या कलम ३ (१) अनुसार व केंद्र शासनाच्या कामगार मंत्रालयाने निर्गमित केलेल्या दि. २६ सप्टेंबर १९९६ च्या अधिसूचनेनुसार, जमिनीची किंमत वगळून बांधकाम खर्चाच्या १% दराने उपकर वसूल केला जात आहे.
 3. सदरील उपकर वसुलीसाठी बांधकामास परवानगी देणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय कार्यालये व शासकीय उपक्रम यांच्या अधिकाऱ्यांना अधिकार दिलेले आहेत तसेच महाराष्ट्र शासन, उद्योग, उर्जा व कामगार विभाग यांच्या दि. १६ एप्रिल २००८ रोजीच्या अधिसूचने अन्वये या विभागातील अधिकाऱ्यांची उपकर वसुली अधिकारी, निर्धारण अधिकारी व अपिलीय प्राधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.
 4. उपकर निर्धारण अधिकाऱ्याने उपकराचे निर्धारण व उपकर वसुली अधिकाऱ्याने उपकर वसूल करून मंडळाकडे ३० दिवसांच्या आत विहित प्रपत्रासह भरणा करणे आवश्यक आहे.
 5. कोणत्याही दिवशी १० किंवा त्यापेक्षा जास्त कामगार कामावर ठेवणाऱ्या अशा सर्व आस्थापना की, ज्यात केंद्र व राज्य शासनांच्या संस्था, स्वायत्त संस्था, सिंचन, रेल्वे, विमान प्राधिकरण, म्हाडा, सिडको, एम.आय.डी.सी., सर्व नगरपालिका महानगरपालिका, टेलिफोन, विद्युत पारेषण, पूर नियंत्रण, बोगदे, पूल, इमारत, रस्ते, मार्ग, नेव्हीगेशन काम, तेल व वायूची जोडणी टाकणे, वायरलेस / रेडीओ / टेलिव्हिजन टॅावर्स इ. बांधकामे करणाऱ्या सर्व आस्थापनांचा समावेश होतो.

उपकराची तरतूद

बांधकाम खर्चाच्या (जमिनीची किंमत वगळून) एकूण रकमेवर १% इतक्या उपकर वसुलीची तरतूद आहे. दि. ०१.०१.२००८ पासून पूर्वलक्षी प्रभावाने उपकर लागू करण्यात आलेला आहे.


उपकर कसा भरावा

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या खात्यावर धनाकर्षाद्वारे (डी.डी. ) भरावा


उपकर न भरल्यास दंड

निर्धारित रकमेवरती दिलेल्या कालावधीत कलम ३ अंतर्गत नमूद केल्याप्रमाणे उपकराची रक्कम न भरल्यास, निर्धारित रकमेवर प्रती महिना २% दराने वसुली किंवा उपकराच्या रकमेइतका दंड आकारण्याची तरतूद आहे.

उपकर कोणाकडे भरावयाचा

इमारत व इतर बांधकामास परवानगी देणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय कार्यालये व शासकीय उपक्रम यांच्या प्राधिकृत अधिकाऱ्याकडे उपकर भरावा.

अ.क्र.

आस्थापना

उपकर वसुली अधिकारी

उपकर निर्धारण अधिकारी

अपिलीय अधिकारी

शासकीय इमारत व इतर बांधकामाकरीता उप अभियंता (सार्वजनिक बांधकाम) कार्यकारी अभियंता (सार्वजनिक बांधकाम) अधिक्षक अभियंता (सार्वजनिक बांधकाम)
सार्वजनिक उपक्रमाच्या इमारत व इतर बांधकामाकरीता कार्यकारी अभियंता (संबंधित सार्वजनिक उपक्रम) सहसंचालक / अतिरिक्त संचालक / महाव्यवस्थापक (संबंधित सार्वजनिक उपक्रम) संचालक (संबंधित सार्वजनिक उपक्रम)
ज्या बांधकामास महापालिकेची मंजूरी आवश्यक आहे त्याकरीता सहाय्यक महानगरपालिका आयुक्त / वॉर्ड ऑफिसर महानगरपालिका उपआयुक्त महानगरपालिका आयुक्त
ज्या बांधकामास नगर परिषदेची मंजूरी आवश्यक आहे त्याकरीता कर निरीक्षक नगर परिषद मुख्य अधिकारी नगर परिषद नगर परिषद उपजिल्हाधिकारी क्षेत्राचे कार्यभार असलेले
ज्या बांधकामाकरीता ग्रामपंचायतीची मंजूरी आवश्यक आहे त्याकरीता ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत गटविकास अधिकारी पंचायत समिती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद
उपरोक्त अ. क्र. १ ते ५ मध्ये समाविष्ट नसलेल्या इमारत व इतर बांधकामाच्या मंजुरीकरिता तहसीलदार उपविभागीय अधिकारी जिल्हाधिकारी

बांधकाम कामगार नोंदणी

 • सन २००१ च्या जनगणनेनुसार राज्यात एकुण सुमारे १४.०९ लाख इतके बांधकाम कामगार आहेत. तथापीअधिकृत आकडेवारी जाहीर झाली नाही. सन २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्येत १५.९९% झालेली वाढ विचारात घेता ढोबळमानाने बांधकाम कामगारांची संख्या १७.५० लाख इतकी अपेक्षित आहे.
 • राज्यात मार्च २०१९ अखेर १६,१०,६१९ बांधकाम कामगारांची नोंदणी झाली असून त्यातील ९,२७,५८३ कामगारांची नोंदणी जीवित आहे.
 • महाराष्ट्राची आर्थिक पाहणी, २०१५-१६ मधील माहितीनुसार राज्यात १.०२ लाख बांधकाम आस्थापना अस्तित्वात आहेत.
 • स्वयंपूर्ण त्रिपक्षीय मंडळ दि. ०१.०५.२०११ रोजी स्थापन झाल्यानंतर दि. ०३.११.२०११ रोजी लाभार्थ्याकडून अंशदान घेण्याबाबतची अधिसूचना निर्गमित करण्यात आली
 • तद्नंतर कामगारांची नोंदणी प्रक्रिया कामगार आयुक्त कार्यालयातील उपलब्ध मनुष्यबळाद्वारे लागलीच सुरु करण्यात आली.
नोंदणी पात्रता निकष नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
 • १८ ते ६० वर्षे वयोगटातील बांधकाम कामगार
 • मागील बारा महिन्यांमध्ये 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले कामगार
 • मंडळात नोंदणी करण्याकरीता फॉर्म – V भरुन खालील प्रमाणे दस्तऐवजासह अर्ज सादर करणे अनिवार्य आहे.
 • नोंदणी फी :- रू. 25/- व वार्षिक वर्गणी रू.60/-
 • वयाचा पुरावा
 • 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
 • रहिवासी पुरावा
 • ओळखपत्र पुरावा
 • पासपोर्ट आकाराचे 3 फोटो

अर्ज डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
   डाउनलोड

आस्थापना / बांधकाम मालक / विकासक नोंदणी

महाराष्ट्राची आर्थिक पाहणी, २०१५-१६ मधील माहितीनुसार राज्यात १.०२ लाख बांधकाम आस्थापना अस्तित्वात आहेत.

इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार नियमन व सेवाशर्ती) अधिनियम, १९९६ च्या कलम (७) अन्वये सदर अधिनियम लागू असलेल्या सर्व आस्थापनांनी नोंदणी करून घेणे अनिवार्य आहे.मजुरांची संख्या फी
५० पर्यंत रु. २५०/-
५० पेक्षा अधिक पण १०० पेक्षा कमी रु. ५००/-
१०० पेक्षा अधिक पण ३०० पेक्षा कमी रु. १०००/-
३०० पेक्षा अधिक पण ५०० पेक्षा कमी रु. २०००/-
५०० पेक्षा अधिक रु. २५००/-
 


ऑन-लाईन नोंदणीसाठी खालील लिंक वर क्लिक करा
lms.mahaonline.gov.in

Bank Details for Cess Collection

Sr. No.

Bank & Branch Name

Account Type

Account No.

IFSC Code

1 Central Bank of India
[BKC, Bandra (E), Mumbai]
Current Account 3671178591 CBIN0282611

Bank Details for Construction Workers Registration fee

Sr. No.

Bank & Branch Name

Account Type

Account No.

IFSC Code

1 Central Bank of India
[BKC, Bandra (E), Mumbai]
Saving Account 3230821864 CBIN0282611

Bank Details for Construction Workers Membership fee

Sr. No.

Bank & Branch Name

Account Type

Account No.

IFSC Code

1 Central Bank of India
[BKC, Bandra (E), Mumbai]
Saving Account 3143044488 CBIN0282611

महत्वाचे दुवे

21 प्रकारचे कामे करणारे कामगार

 • दगड कापणे, फोडणे व दगडाचा बारीक चुरा करणे.
 • लादी किंवा टाईल्स कापणे व पॉलिश करणे.
 • रंग, वॉर्निश लावणे, इत्यादीसह सुतारकाम.
 • गटार व नळजोडणीची कामे.
 • वायरिंग, वितरण, तावदान बसविणे इत्यादीसहित विद्युत कामे.
 • अग्निशमन यंत्रणा बसविणे व तिची दुरुस्ती करणे.
 • वातानुकूलित यंत्रणा बसविणे व तिची दुरुस्ती करणे.
 • उद्वाहने, स्वयंचलित जिने इत्यादी बसविणे.
 • सुरक्षा दरवाजे उपकरणे इत्यादी बसविणे.
 • लोखंडाच्या किंवा धातुच्या ग्रिल्स, खिडक्या, दरवाजे तयार करणे व बसविणे.
 • जलसंचयन संरचनेचे बांधकाम करणे.
 • सुतारकाम करणे, आभाशी छत, प्रकाश व्यवस्था, प्लास्टर ऑफ पेरीस यांसहित अंतर्गत (सजावटीचे) काम.
 • काच कापणे, काचरोगण लावणे व काचेची तावदाने बसविणे.
 • कारखाना अधिनियम, 1948 खाली समावेश नसलेल्या विटा, छप्परांवरील कौल इत्यादी तयार करणे.
 • सौर तावदाने इत्यादींसारखी ऊर्जाक्षम उपकरण बसविणे.
 • स्वयंपाकखोली सारख्या ठिकाणी वापरण्यासाठी मोडुलर (आधुनिक) युनिट बसविणे.
 • सिमेन्ट काँक्रिटच्या साचेबद्ध वस्तू इत्यादी तयार करणे व बसविणे.
 • जलतरण तलाव, गोल्फचे मैदान इत्यादीसह खेळ किंवा मनोरंजनाच्या सुविधांचे बांधकाम करणे.
 • माहिती फलक, रोड फर्निचर, प्रवाशी निवारे किंवा बसस्थानके, सिग्नल यंत्रणा इत्यादी बांधणे किंवा उभारणे.
 • रोटरीजचे बांधकाम करणे, कारंजे बसविणे इत्यादी.
 • सार्वजनिक उद्याने, पदपथ, रमणीय भू-प्रदेश इत्यादींचे बांधकाम.

  मंडळाच्या खात्यामध्ये उपकर जमा करण्यासाठी चलान नमुना

  मंडळाने विकसित केलेल्या संगणक प्रणालीमार्फत उपकर जमा करण्याची कार्यपद्धती

  मंडळाच्या खात्यामध्ये उपकार जमा करण्यासाठी बँक/शाखा यांची यादी