नव्याने नोंदणी/नुतणीकरण अर्ज संगणक प्रणालीवर सादर करण्याकरिता संबंधित बांधकाम कामगारांनी आपल्या मूळ कागदपत्रांसह नजिकच्या तालुका कामगार सुविधा केंद्रात उपस्थित राहावे.

असंघटीत कामगारांसाठी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा शुभारंभ झाला असून या योजनेमध्ये बांधकाम कामगार, घरेलू कामगार,माथाडी कामगार, सुरक्षारक्षक इत्यादी यांना ६० वर्ष पूर्ण झाल्यानंतर दरमहा ३००० रुपये आश्वासित पेन्शन मिळणार आहे.

सदर नोंदणीसाठी पात्रता  :

  • १८ ते ४० वयोगट
  • मासिक उत्पन्न रु. १५००० पेक्षा कमी
  • ESI, NPS, EPFO चा सभासद नसावा

आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • बँक पासबूक
  • भ्रमणध्वनी क्रमांक
  • वयानुसार पहिले मासिक अंशदान

 

 

  • नोंदणीसाठी नजीकच्या नागरी सुविधा केंद्रास भेट द्यावी.
  • नजीकच्या नागरी सुविधा केंद्राच्या माहितीसाठी http://locator.csccloud.in/ या संकेतस्थळाचा वापर करावा.
  • अधिक माहितीसाठी १८००२६७६८८८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.