महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत शासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवा करार पध्दतीने विवक्षीत कामासाठी घेण्याबाबतच्या सूचना मराठी वर्तमानपत्रात प्रसिध्द करणेबाबत.   Applications will be rejected if clarification is not given in 7 days on receipt of message. / ज्या नोंदणी , नूतनीकरण व लाभाच्या अर्जावर स्पष्टीकरण मागवले आहे त्यांनी ७ दिवसाच्या आत स्पष्टीकरण देणे जरुरी आहे. जर विहित मुदतीत स्पष्टीकरण दिले नाही तर अर्ज नाकारण्यात येतील याची कृपया नोंद घ्यावी.

कल्याणकारी योजना

1.सामाजिक सुरक्षा

पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी रु. ३०,०००/-

आवश्यक पात्रता

  1. विवाह नोंदणी प्रमाणपत्र
  2. प्रथम विवाह असल्याबाबत शपतपत्र

मध्यान्ह भोजन योजना

आवश्यक पात्रता

  1. विहीत नमुन्यातील मागणी पत्र

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना

आवश्यक पात्रता

  1. पाल्याचे शाळेचे ओळखपत्र

प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना

आवश्यक पात्रता

  1. विहीत नमुन्यातील हमीपत्र

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना

आवश्यक पात्रता

  1. विहीत नमुन्यातील हमीपत्र

पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजना

आवश्यक पात्रता

  1. विहीत नमुन्यातील मागनी पत्र
2.शैक्षणिक

 
 या योजने अंतर्गत सर्व लाभ फक्त नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन मुलांसाठी लागू आहेत.

१. इयत्ता १ ते ७ च्या विद्यार्त्यांसाठी प्रतिवर्ष रु. २५००/-

२. इयत्ता ८ ते १० च्या विद्यार्त्यांसाठी प्रतिवर्ष रु. ५०००/-

(किमान 75% अथवा अधिक उपस्थिती आवश्यक)

आवश्यक पात्रता

  1. ७५% हजेरी बाबत शाळेचा दाखला

इयत्ता १० व १२ वी मध्ये किमान ५०% किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास रु. १०,०००/-

आवश्यक पात्रता

  1. किमान ५०% किंवा अधिक गुण प्राप्त झाल्याची गुणपत्रिका

इयत्ता ११ व १२ च्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्षी रु. १०,०००/-

आवश्यक पात्रता

  1. १० वी ११ वी ची गुणपत्रिका

पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्षी रु. २०,०००/- (नोंदीत कामगाराच्या पत्नीसही लागू )

आवश्यक पात्रता

  1. मागील शैक्षणिक इयत्तेत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक /प्रमाणपत्र
  2. चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतल्याबाबतची पावती /बोनाफाईड

१. वैद्यकीय पदवीकरिता प्रतिवर्षी रु. १,००,०००/-

२. अभियांत्रिकी पदवीकरिता प्रतिवर्षी रु. ६०,०००/-

(नोंदीत कामगाराच्या पत्नीसही लागू )

आवश्यक पात्रता

  1. मागील शैक्षणिक इयत्तेत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक /प्रमाणपत्र
  2. चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतल्याबाबतची पावती /बोनाफाईड

१. शासनमान्य पदविकेसाठी प्रति शैक्षणिकवर्षी रु. २०,०००/-

२. शासनमान्य पदव्युत्तर पदविकेसाठी प्रति शैक्षणिकवर्षी रु. २५,०००/-

आवश्यक पात्रता

  1. मागील शैक्षणिक इयत्तेत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक /प्रमाणपत्र
  2. चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतल्याबाबतची पावती /बोनाफाईड

नोंदीत बांधकाम कामगाराच्या दोन पाल्यांना MS -CIT शिक्षणाच्या शुल्काची प्रतिपूर्ती

आवश्यक पात्रता

  1. MS-CIT ऊत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र व शुक्लाची पावती
3. आरोग्यविषयक

1.

नैसर्गिक प्रसूतीसाठी-रु.१५,०००/-

2.शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी-
रु.२०,०००/-
(दोन जीवित अपत्यांसाठी)

आवश्यक पात्रता

  1. सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेले नैसर्गिक /शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीचे प्रमाणपत्र
  2. वैद्यकीय उपचाराची देयके
  3. पुढे…

गंभीर आजाराच्या उपचारार्थ-रु.१,००,०००/- (लाभार्थी कामगार ,त्याच्या/तिच्या कुटुंबियांना)

आवश्यक पात्रता

  1. सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गंभीर आजार असल्याबाबत दिलेले प्रमाणपत्र
  2. वैद्यकीय उपचार विषयक कागदपत्रे

एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे १८ वर्षापर्यंत-रु.१,००,०००/- मुदत बंद ठेव

आवश्यक पात्रता

  1. सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेले कुटुंबनियोजन शाश्त्रक्रियेबाबतचे प्रमाणपत्र
  2. अर्जदारास एक कन्या अपत्यापेक्षा जास्त अपत्य नसल्याचा पुरावा शपथपत्र

रु.२,००,०००/-
७५% किंवा कायमचे अपंगत्व आल्यास –
२,००,०००/-

आवश्यक पात्रता

  1. ७५% अपंगत्व असल्याचे सक्षम वैद्यकीय अधिकारी /मंडळाचे प्रमाणपत्र व वैद्यकीय उपचाराची देयके

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना

आवश्यक पात्रता

  1. योजनेकरिता विहीत शिधापत्रिका

आरोग्य तपासणी करणे

आवश्यक पात्रता

  1. शासकीय /निमशासकीय ,व्यसनमुक्ती केंद्रातून उपचार घेतल्याचे शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र
4. आर्थिक

कामगाराचा कामावर असताना मृत्यु झाल्यास – रु.५,००,०००/- (कायदेशीर वारसास)

आवश्यक पात्रता

  1. सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेला मृत्यु दाखला
  2. बांधकाम कामगार कामावर असताना मृत्यु झाल्याबाबतचा पुरावा
  3. पुढे …

कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास –
रु.२,००,०००/- (कायदेशीर वारसास)

आवश्यक पात्रता

  1. सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेला मृत्यु दाखला

अटल बांधकाम कामगार आवास योजना (शहरी) अर्थसहाय्य
रु.२,००,०००/-

आवश्यक पात्रता

  1. प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र असल्याबाबत सक्षम अधिकाऱ्याचे पत्र /प्रमाणित यादी

अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) अर्थसहाय्य
रु.२,००,०००/-

आवश्यक पात्रता

  1. प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र असल्याबाबत सक्षम अधिकाऱ्याचे पत्र /प्रमाणित यादी

कामगाराचा मृत्यू झाल्यास अंत्यविधीकरिता- रु. १०,०००/-

(वय ५० ते ६०)

आवश्यक पात्रता

  1. सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेला मृत्यु दाखला

कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पत्नीस अथवा स्त्री कामगाराच्या विधुर पतीस- रु. २४,०००/- ( ५ वर्षाकरिता)

आवश्यक पात्रता

    सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेला मृत्यु दाखला

गृहकर्जावरील रू.६,००,०००/- पर्यंतच्या व्याजाची रक्कम किंवा रु. २,००,०००/-

आवश्यक पात्रता

  1. राष्ट्रीयीकृत बँकेत कर्ज घेतल्याचा पुरावा
  2. कर्ज विम्याची पावती
  3. घर पती -पत्नीच्या संयुक्त नावे नोंदणीकृत असल्याचा पुरावा
  4. पुढे…