नव्याने नोंदणी/नुतणीकरण अर्ज संगणक प्रणालीवर सादर करण्याकरिता संबंधित बांधकाम कामगारांनी आपल्या मूळ कागदपत्रांसह नजिकच्या तालुका कामगार सुविधा केंद्रात उपस्थित राहावे.   मुंबई (पूर्व) विक्रोळी तालुका सुविधा केंद्राचे कार्यालय एम.एम.टी.सी. हाऊस, दुसरा मजला, प्लॉट नं. सी 22, ब्लॉक - ई, बांन्द्रा कुर्ला संकुल,बांन्द्रा (पुर्व),मुंबई 400 051 येथे स्थलांतरीत झाले आहे

उद्देश आणि उद्दीष्टे

  • ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुलभीकरण.
  • बांधकाम कामगारांपर्यंत पोहोचणे आणि त्यांच्याकडून माहिती गोळा करणे.
  • लाभासाठीचा अर्ज दाखल करण्याच्या पद्धतींत सुलभपणा आणणे.
  • कल्याणकारी योजनांच्या लाभ देण्याच्या पद्धतींत सुटसुटीतपणा आणणे.
  • लाभाची रक्कम थेट बँक खात्यात जमा करणे.
  • बांधकाम कामगार नोंदणी वाढविण्यासाठी त्यांच्या कामाच्या जागेवर जाऊन नोंदणी करणे.
  • कार्यकारी क्षमतेमध्ये कुशलता आणणे.
  • प्रत्येक बांधकाम कामगाराला एकमेव नोंदणी क्रमांक देणे.
  • नोंदणीच्या मान्यतेसाठी मान्यताप्राप्त अधिकाऱ्याकडून नोंदणीची ऑनलाइन प्रक्रिया.
  • कल्याणकारी योजनांच्या व्यवस्थापनासाठी प्रगत विश्लेषण.