MahaBOCW Logo
Maharastra Government
Indian Emblem

मदत पृष्ठ

१. बांधकाम कामगार म्हणून मी कधी नोंदणी करू शकतो?

जर तुमचे वय १८ ते ६० च्या दरम्यान असेल.

२. बांधकाम कामगार म्हणून नोंदणीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

मागील वर्षी बांधकाम कामगार असल्याचा पुरावा म्हणून तुम्हाला ९० दिवसांचे काम प्रमाणपत्र आणि आधार कार्ड आवश्यक आवश्यक आहे.

३. बांधकाम कामगार म्हणून नोंदणीसाठी मी कसा अर्ज करू शकतो?

कामगार बांधकाम कामगार म्हणून नोंदणीसाठी मंडळाच्या https://mahabocw.in वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकता.

४. नोंदणी किती वर्षांसाठी वैध आहे?

नोंदणी फक्त एका वर्षासाठी वैध आहे. कामगाराला दरवर्षी नोंदणीचे नूतनीकरण करावे लागेल.

५. सदस्यता नूतनीकरण करण्याची प्रक्रिया काय आहे?

कामगाराला मंडळाच्या https://mahabocw.in वेबसाइटला भेट द्यावी लागेल आणि सदस्यता नूतनीकरणासाठी अर्ज करण्यासाठी नूतनीकरण टॅबवर क्लिक करावे लागेल.

६. नूतनीकरणासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

ऑनलाइन सादर केलेल्या नूतनीकरण अर्जासोबत, कामगाराला अर्जाच्या मागील वर्षात बांधकाम कामगार म्हणून काम केल्याचा ९० दिवसांच्या कामाचा दाखला सादर करावा लागेल.

७. मंडळाकडून देण्यात येणाऱ्या सुविधा कोणाला मिळू शकतात?

MBOCWW मंडळात नोंदणीकृत आणि ज्यांचे सदस्यत्व सक्रिय आहे तोच बांधकाम कामगार फक्त मंडळाकडून देण्यात येणाऱ्या सुविधांचा लाभ घेऊ शकतो.

८. मंडळाकडून कोणते फायदे दिले जातात?

मंडळाकडून खालील श्रेणींमध्ये विविध सुविधा दिल्या जातात:

  1. शैक्षणिक सहाय्य
  2. सामाजिक सुरक्षा सहाय्य
  3. आर्थिक सहाय्य
  4. आरोग्य सेवा सहाय्य

कामगार –> कल्याणकारी योजना या शीर्षकाखाली विविध योजना वेबसाइटवर पाहता येतील.

९.नोंदणीकृत कामगार कोणत्या योजनांसाठी अर्ज करू शकतो?

कामगार IWBMS मध्ये नोंदणीच्या वेळी उपलब्ध असलेल्या त्याच्या तपशीलांवर आधारित योजनांसाठी अर्ज करू शकतो

१०.योजनांसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

कागदपत्रे योजनेनुसार आहेत आणि विशिष्ट लाभासाठी अर्ज करताना ती पाहता येतात.