उद्देश आणि उद्दीष्टे

  • ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुलभीकरण.
  • बांधकाम कामगारांपर्यंत पोहोचणे आणि त्यांच्याकडून माहिती गोळा करणे.
  • लाभासाठीचा अर्ज दाखल करण्याच्या पद्धतींत सुलभपणा आणणे.
  • कल्याणकारी योजनांच्या लाभ देण्याच्या पद्धतींत सुटसुटीतपणा आणणे.
  • लाभाची रक्कम थेट बँक खात्यात जमा करणे.
  • बांधकाम कामगार नोंदणी वाढविण्यासाठी त्यांच्या कामाच्या जागेवर जाऊन नोंदणी करणे.
  • कार्यकारी क्षमतेमध्ये कुशलता आणणे.
  • प्रत्येक बांधकाम कामगाराला एकमेव नोंदणी क्रमांक देणे.
  • नोंदणीच्या मान्यतेसाठी मान्यताप्राप्त अधिकाऱ्याकडून नोंदणीची ऑनलाइन प्रक्रिया.
  • कल्याणकारी योजनांच्या व्यवस्थापनासाठी प्रगत विश्लेषण.