कुटुंब नियोजन प्रोत्साहनपर योजना

कुटुंब नियोजन प्रोत्साहनपर योजना

नोंदीत लाभार्थी कामगार अथवा त्याच्या पती / पत्नीने एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास एका मुलीच्या नावे १८ वर्षापर्यंत रु. १,००,०००/- (रु. एक लाख फक्त) मुदत बंद ठेव .

लाभाचे स्वरूप

एका मुलीच्या नावे १८ वर्षापर्यंत रु. १,००,०००/- मुदत बंद ठेव.

कागदपत्रे (छायांकित प्रती)

 • नोंदणी पावती
 • मंडळाचे ओळखपत्र
 • बँकेचे पासबुक
 • रहिवासी पुरावा ( रेशन कार्ड / लाईट बील )
 • सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेले शस्त्र क्रियेबाबतचे प्रमाणपत्र
 • कामगारांच्या नावे आधारकार्ड / मतदान कार्ड / पॅनकार्ड / पासबुक इ.
 • पत्नीच्या नावे आधारकार्ड / मतदान कार्ड / पॅनकार्ड इ.
 • अर्जदाराचे मुलीशी असलेले नाते दर्शविणारा पुरावा ( रेशन कार्ड )
 • अर्जदारास एक कन्या अपत्यपेक्षा जास्त अपत्य नसल्याचा पुरावा
 • सर्व सत्यप्रती स्वय: साक्षांकित करणे व स्वाक्षरी करणे.

नोंदीत लाभार्थी स्त्री बांधकाम कामगारास तसेच नोंदीत पुरुष लाभार्थी बांधकाम कामगाराच्या पत्नीस दोन जीवित अपत्यांपर्यंत नैसर्गिक प्रसूतीसाठी रु. १५,०००/- ( रु. पंधरा हजार फक्त ) व शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी रु. २०,०००/- ( रु. वीस हजार फक्त ) एवढे आर्थिक सहाय्य.

लाभाचे स्वरूप

नैसर्गिक प्रसूतीसाठी - रु. १५,०००/-
शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी - रु. २०,०००/-

कागदपत्रे (छायांकित प्रती)

 • नोंदणी पावती
 • मंडळाचे ओळखपत्र
 • बँकेचे पासबुक
 • रेशन कार्ड
 • प्रसूतीबाबत सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र
 • ग्रामपंचायत / नगरपरिषद / महानगर पालिका यांचेकडून काढलेले बाळाचे जन्म प्रमाणपत्र
 • कामगारांच्या नावे आधारकार्ड
 • कामगाराच्या पत्नीचे आधारकार्ड / मतदान कार्ड / पॅन कार्ड इ.
 • कामगाराच्या पत्नीचे फोटो
 • सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेले प्रसूतीचे प्रमाणपत्र
 • सर्व सत्यप्रती स्वयं: साक्षांकित करणे