शैक्षणिक अर्थसहाय्य योजना

शैक्षणिक अर्थसहाय्य योजना

नोंदीत लाभार्थी बांधकाम कामगाराच्या प्रति शैक्षणिक वर्षी शाळेतील किमान ७५% किंवा अधिक उपस्थिती असणाऱ्या दोन पाल्यांस इयत्ता १ ली ते ७ वी साठी प्रतिवर्षी रु. २५००/- ( रु. दोन हजार पाचशे फक्त ) आणि इयत्ता ८ वी ते १० वी साठी प्रतिवर्षी रु. रु. ५०००/- ( रु. पाच हजार फक्त ) एवढे शैक्षणिक आर्थिक सहाय्य.

लाभाचे स्वरूप

१ ली ते ७ वी साठी प्रतिवर्षी - रु. २५००/-
८ ली ते १० वी साठी प्रतिवर्षी - रु. ५०००/-

कागदपत्रे (छायांकित प्रती)

 • नोंदणी पावती
 • मंडळाचे ओळखपत्र
 • बँकेचे पासबुक
 • रहिवासी पुरावा ( रेशन कार्ड / लाईट बील )
 • शाळेमध्ये शिक्षण घेत असल्याचा पुरावा, बोनाफाइड दाखला ( मूळ प्रत )
 • ७५% हजेरीबाबत शाळेचा दाखला / हजेरी पत्रक
 • रेशन कार्ड
 • सर्व सत्यप्रती स्वयं: साक्षांकित करणे

नोंदीत लाभार्थी बांधकाम कामगाराच्या २ पाल्यांना इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी मध्ये किमान ५०% किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास रु. १०,०००/- ( रु. दहा हजार फक्त ) एवढे प्रोत्साहनात्मक शैक्षणिक सहाय्य.

लाभाचे स्वरूप

इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी मध्ये किमान ५०% किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास रु. १०,०००/-

कागदपत्रे (छायांकित प्रती)

 • नोंदणी पावती
 • मंडळाचे ओळखपत्र
 • बँकेचे पासबुक
 • रहिवासी पुरावा (रेशन कार्ड / लाईट बील इ.)
 • १० वी व १२ वी ची गुणपत्रिका
 • शिक्षण घेत असल्याबाबतचा शाळा / कॉलेजचा दाखला, बोनाफाईड दाखला ( मूळ प्रत )
 • कामगारांच्या नावे आधार कार्ड / मतदान कार्ड / पॅनकार्ड / पासबुक इ.
 • पाल्याचे शाळेचे ओळखपत्र / कॉलेजचे ओळखपत्र
 • सर्व सत्यप्रती स्वयं: साक्षांकित करणे

नोंदीत लाभार्थी कामगाराच्या २ पाल्यांना इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी च्या शिक्षणासाठी प्रती शैक्षणिक वर्षी रु. १०,०००/- ( रु. दहा हजार फक्त ) एवढे शैक्षणिक सहाय्य.

लाभाचे स्वरूप

२ पाल्यांना इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी च्या शिक्षणासाठी प्रती शैक्षणिक वर्षी रु. १०,०००/-

कागदपत्रे (छायांकित प्रती)

 • नोंदणी पावती
 • मंडळाचे ओळखपत्र
 • बँकेचे पासबुक
 • रहिवासी पुरावा (रेशन कार्ड / लाईट बील इ.)
 • १० वी व ११ वी ची गुणपत्रिका
 • शिक्षण घेत असल्याबाबतचा शाळा / कॉलेजचा दाखला, बोनाफाईड दाखला ( मूळ प्रत )
 • कामगारांच्या नावे आधार कार्ड / मतदान कार्ड / पॅनकार्ड / पासबुक इ.
 • पाल्याचे शाळेचे ओळखपत्र / कॉलेजचे ओळखपत्र
 • ११ वी व १२ वी शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतल्याचा पुरावा
 • सर्व सत्यप्रती स्वयं: साक्षांकित करणे

नोंदीत लाभार्थी कामगाराच्या २ पाल्यांना अथवा पुरुष कामगाराच्या पत्नीस पदवीच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या प्रवेश, पुस्तके व शैक्षणिक सामुग्रीसाठी प्रतीवर्षी रु. २०,०००/- ( रु. वीस हजार फक्त ) एवढे शैक्षणिक सहाय्य.

लाभाचे स्वरूप

२ पाल्यांना पदवीच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या प्रवेश पुस्तके व शैक्षणिक सामुग्रीसाठी प्रतिवर्षी रु. २०,०००/-

कागदपत्रे (छायांकित प्रती)

 • नोंदणी पावती
 • मंडळाचे ओळखपत्र
 • बँकेचे पासबुक
 • रहिवासी पुरावा (रेशन कार्ड / लाईट बील इ.)
 • शिक्षण घेत असल्याबाबतचा शाळेचा दाखला, बोनाफाईड दाखला ( मूळ प्रत )
 • मागील शैक्षणिक इयत्ता उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक / प्रमाणपत्र
 • कामगारांच्या नावे आधार कार्ड / मतदान कार्ड / पॅनकार्ड / पासबुक इ.
 • पाल्याचे शाळेचे ओळखपत्र / कॉलेजचे ओळखपत्र
 • शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या पावत्या व पुस्तके व शैक्षणिक सामुग्री खरेदीच्या पावत्या सोबत जोडणे
 • सर्व सत्यप्रती स्वयं: साक्षांकित करणे

नोंदीत लाभार्थी कामगाराच्या २ पाल्यांना अथवा पुरुष कामगाराच्या पत्नीस शासनमान्य वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालयांत किंवा संस्थेत प्रवेशासाठी, पुस्तके व शैक्षणिक साहित्य खरेदी इत्यादीसाठी प्रति शैक्षणिकवर्षी वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाकरिता रु. १,००,०००/- ( रु. एक लाख फक्त ) व अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाकरिता रु. ६०,०००/- ( रु. साठ हजार फक्त ) इतके शैक्षणिक अर्थसहाय्य.

लाभाचे स्वरूप

वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाकरिता रु. १,००,०००/-
अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाकरिता रु. ६०,०००/-

कागदपत्रे (छायांकित प्रती)

 • नोंदणी पावती
 • मंडळाचे ओळखपत्र
 • बँकेचे पासबुक
 • रहिवासी पुरावा (रेशन कार्ड / लाईट बील इ.)
 • शिक्षण घेत असल्याबाबतचा शाळा / कॉलेजचा दाखला, बोनाफाईड दाखला ( मूळ प्रत )
 • मागील शैक्षणिक इयत्ता उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक / प्रमाणपत्र
 • कामगारांच्या नावे आधार कार्ड / मतदान कार्ड / पॅनकार्ड / पासबुक इ.
 • पाल्याचे शाळेचे ओळखपत्र / कॉलेजचे ओळखपत्र
 • शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या पावत्या, पुस्तके व शैक्षणिक सामुग्री खरेदीच्या पावत्या सोबत जोडणे
 • सर्व सत्यप्रती स्वयं: साक्षांकित करणे

नोंदीत लाभार्थी कामगाराच्या २ पाल्यांना, शासनमान्य पदविकेमध्ये शिक्षण घेत असलेल्या पाल्यास प्रति शैक्षणिक वर्षी रु. २०,०००/- ( रु. वीस हजार फक्त ) आणि पदव्युत्तर पदविकामध्ये शिक्षण घेत असलेल्या पाल्यास प्रती शैक्षणिक वर्षी रु. २५,०००/-( रु. पंचवीस हजार फक्त ) एवढे आर्थिक सहाय्य

लाभाचे स्वरूप

पदविका - रु. २०,०००/-
पदव्युत्तर पदविका - रु. २५,०००/-

कागदपत्रे (छायांकित प्रती)

 • नोंदणी पावती
 • मंडळाचे ओळखपत्र
 • बँकेचे पासबुक
 • रहिवासी पुरावा (रेशन कार्ड / लाईट बील इ.)
 • इ. १० वी व १२ वी पदविका, पदव्युत्तर पदविकेच्या गुणपत्रिका
 • शिक्षण घेत असल्याबाबतचा शाळा / कॉलेजचा दाखला, बोनाफाईड दाखला ( मूळ प्रत )
 • मागील शैक्षणिक इयत्ता उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक / प्रमाणपत्र
 • कामगारांच्या नावे आधार कार्ड / मतदान कार्ड / पॅनकार्ड / पासबुक इ.
 • पाल्याचे शाळेचे ओळखपत्र / कॉलेजचे ओळखपत्र
 • पदविकेमध्ये व पदव्युत्तर पदविकामध्ये प्रवेश घेतलेल्या पावत्या जोडणे
 • सर्व सत्यप्रती स्वयं: साक्षांकित करणे

संगणकाचे शिक्षण ( MSCIT ) घेत असलेल्या नोंदीत लाभार्थी बांधकाम कामगाराच्या २ पाल्यांना, शुल्काची परिपूर्ती तथापि, MSCIT उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यास सदर शुल्काची प्रतिपूर्ती करण्यात यावी

लाभाचे स्वरूप

२ पाल्यांना MSCIT शुल्काची परिपूर्ती

कागदपत्रे (छायांकित प्रती)

 • नोंदणी पावती
 • मंडळाचे ओळखपत्र
 • बँकेचे पासबुक
 • रहिवासी पुरावा (रेशन कार्ड / लाईट बील इ.)
 • MSCIT कोर्स प्रमाणपत्र व शुल्काची पावती
 • अर्जदाराचे पाल्याशी असलेले नाते दर्शविणारा पुरावा
 • अर्जदाराच्या नावे आधारकार्ड / मतदान कार्ड / पॅनकार्ड / पासबुक इ.
 • पाल्याचे शाळेचे ओळखपत्र / कॉलेजचे / संस्थेचे ओळखपत्र
 • सर्व सत्यप्रती स्वयं: साक्षांकित करणे