मंडळाच्या ५७ व्या दि. ०२-०३-२०२१ रोजीच्या बैठकीत खालील प्रमाणे ठराव पारित करण्यात आलेला आहे . ठराव क्र ५७(२)/२०२१:- सन २०२०-२१ या वित्तीय वर्षात कोविद १९ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे बहुतांश कालावधीत शाळा / महाविद्यालये बंद होती अथवा ऑनलाईन पद्धतीने कार्यरत होती अशा स्थितीत दिनांक ०१-०४-२०२० ते दि . ३१ - ०३- २०२१ या कालावधीत शैक्षणिक सहाय्याच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी शाळा /महाविद्यालयातील उपस्थितीची अट शिथिल करण्यात येत आहे.    ठराव क्र ५७(५)/२०२१:- कोविद १९ विषाणूच्या प्रादुर्भाव कालावधीत जिल्हा कार्यालये नियमितपणे कार्यरत नसल्यामुळे नूतनीकरण होऊ न शकलेले व दि. ०१-०४- २०२० ते ३१-०३-२०२१ या कालावधीत बांधकामाच्या ठिकाणी अपघाती मृत्यू झालेल्या प्रकरणी बांधकाम कामगारांच्या वारसांना मंजूर योजनेकरिता देय अर्थसहाय्य देण्यात यावे. असा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला.

सूचना

माहे जुलै 2020 ते 22.04.2021 या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने नोंदणी झालेल्या बाांधकाम कामगारांपैकी ज्या बाांधकाम कामगारांनी अद्याप नोंदणी फी व वर्गणीची रक्कम जिल्हा कार्यालयात जमा केलेली नाही अशा बाांधकाम कामगारांनी खालील तक्यात नमदू तपशिलानुसार नोंदणी फी व वर्गणीची रक्कम मंडळाच्या बँक खात्यात जमा करावी व तसे लिंक वर कळवावे यानसुार मंडळाकडून रू.1500/- प्रमाणे अर्थसहाय्याची रक्कम नोंदीत बाांधकाम कामगाराांच्या बँक खाती जमा करण्यात येईल.

अ.क्र. बाब रक्कम रू. बँकेचे नाव बँकेचे खाते क्रमांक IFSC कोड
1. नोंदणी फी 25/- सेंट्रल बकँ ऑफ इंडिया 3230821864 CBIN0282611
2. वर्गणी / नतुनीकरण 12/- सेंट्रल बकँ ऑफ इंडिया 3143044488 CBIN0282611