इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या कलम १८ (१) नुसार प्रत्येक राज्याने त्रिपक्षीय मंडळाची स्थापना करणे आवश्यक आहे. तथापि, महाराष्ट्र शासन अधिसु्चना दिनांक ०४.०८.२००७ अन्वये प्रथमत: ५ शासकीय सदस्यांची नियुक्ती महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळावर करण्यात आली होती. तदनंतर दिनांक १ मे २०११ व २८ मे २०१५ रोजीच्या शासन अधिसूचनेद्वारे परिपुर्ण त्रिपक्षीय मंडळाची पुनर्रचना करण्यात आलेली आहे. यामध्ये अध्यक्षांसह, ३ शासन प्रतिनिधी, ३ मालक प्रतिनिधी व ३ कामगार प्रतिनिधी अशा एकूण १० सदस्यांचा समावेश आहे.
प्रधान सचिव,कामगार
कामगार आयुक्त